‘देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तरच ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होईल’
VIDEO | गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यासारखा तात्काळ राजीनामा द्यावा, कुणी केली आक्रमक मागणी
सोलापूर : राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० कोटींची लाच ऑफर करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे. ‘अमृता फडणवीस यांना खरंच लाच देण्याचा प्रकार घडला की त्यांनी लाच घेतली, यावर शंका आहे. मविआतील गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि चौकशीला सामोरे गेले. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ राजीनामा द्यावा. ‘, असे भाष्य करत राज्य विस्तारक युवासेना शरद कोळी यांनी घणाघाती टीका केली आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर पोलीस यंत्रणा कारवाई करणार का? असा सवालही शरद कोळी यांनी उपस्थित केला आहे. या चौकशीला सामोरे गेल्यानंतरच दूध का दूध और पाणी का पाणी होईल असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.