Nitesh Rane यांच्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील ‘त्या’ टीकेवर कुणाचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘नितेश राणे यांच्या बुडाला…’
VIDEO | संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेवर प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे युवासेना राज्यविस्तारक शरद कोळी या नेत्यानं केली भाजप नेते आणि आमदार नितेश राणे आणि राणे कुटुंबियांवर केली जहरी टीका
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमला देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत लोकं ट्रेननं दाखल होणार असून यावेळी ट्रेनवर हल्ले होऊ शकतात, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अयोध्येत हल्ला होण्याच्या विधानावर नितेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल करताना असे म्हटले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर यासाठी एटीएसला पत्र लिहून त्यांची सखोल चौकशी करा, अशी मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश ऱाणे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे युवासेना राज्यविस्तारक शरद कोळी यांनी जोरदार घणाघात केला आहे. नितेश राणे नेमके कुठले आहेत हे कळायला मार्ग नसल्याने खरी नार्को टेस्ट ही नितेश राणे यांची करण्याची मागणी यावेळी शरद कोळी यांनी केली. नार्को टेस्ट करण्याची गरज ही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना नाही तर नितेश राणे आणि राणे कुटुंबियांना आहे, तर संजय राऊत योग्यच बोलले, असे म्हणत शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल चढवला.