‘राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट नाही’, निवडणूक आयोगात सुनावणीआधी कोणता नवा ट्विस्ट?
tv9 Special report | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांमधील संघर्ष आता थेट पोहोचला निवडणूक आयोगात, राष्ट्रवादीत फूट नाही मग दोन्ही गटाचा दावा नेमका काय? बघा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादीवर अजित पवारांनीही दावा केल्यानंतर, निवडणूक आयोगात 6 ऑक्टोबरला सुनावणी आहे. मात्र त्याआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या वक्तव्यांनी ट्विस्ट आलाय. अजित दादांचा गट सत्तेत आहे आणि शरद पवारांचा गट विरोधात आहे. तरीही राष्ट्रवादीत फूटच पडलेली नाही असं दोन्ही गट म्हणतायत. पक्षात फूट पडलेली नाही, असे जयंत पाटील म्हणतायत तर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळही म्हणतायत की फूट पडलेली नाही. मग राष्ट्रवादीत नेमकं झालंय काय? अर्थात, कायदेशीर बाजू मजबूत राहावी म्हणून जयंत पाटील असतील की भुजबळ यांनी गुगली टाकण्याचा प्रयत्न केलाय. 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात राष्ट्रवादीवर पहिली सुनावणी होणार आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट, या दोन्ही गटाला आयोगानं नोटीस बजावलीय म्हणजे राष्ट्रवादी कोणाची आणि घड्याळ चिन्हं कोणाला मिळणार? यावर दोन्ही बाजूनं युक्तिवाद होणार आहे. मात्र सुनावणीआधीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आयोगावर शंका उपस्थित केलीय. बघा काय म्हणाले…