बारामतीचं मैदान, शरद पवार अन् अजित पवार गटात जोरदार घमासान; ‘जो काकाचा झाला नाही तो…’
पवारांच्या दोन्ही गटात जोरदार घमासान रंगलंय. वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष असतो, असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेत टीकास्त्र डागलंय तर यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना उत्तर दिलंय.
मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : बारामती लोकसभेवरून पवारांच्या दोन्ही गटात जोरदार घमासान रंगलंय. वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष असतो, असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेत टीकास्त्र डागलंय तर यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना उत्तर दिलंय. तर शरद पवार गटाकडून सातत्याने अजित पवार गटावर पक्ष चोरल्याचा दावा करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर बोलताना आम्ही पक्ष चोरला नाही तर निवडणूक आयोगानं आम्हाला दिल्याचे अजित पवार म्हणाले. मात्र फक्त आमदारांच्या संख्येवर पक्ष देण्याला तुम्ही चोर म्हणत होता, असं शरद पवार गटानं उत्तर दिलाय. शिखर बँकेप्रकरणी भाजपने जे आरोप केले होते. त्यावर अजित पवार यांच्यामुळे कारण नसताना शरद पवारांना गोवलं गेलं त्यावरून २०१९ चं उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली. बघा नेमके काय झाले वार-पलटवार?