जितेंद्र आव्हाड यांना दणका, विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयातील नेमप्लेट हटवली; नवी नेमप्लेट कुणाची?
विधानभवन परिसरात देण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकरता एकाच कार्यालयाला तशी नेमप्लेट लावण्यात आली आहे. या कार्यालयाला एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी हटवली
नागपूर, ७ डिसेंबर २०२३ : अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोघं राष्ट्रवादीच्या असणाऱ्या एकाच कार्यालयात बसणार आहेत. विधानभवन परिसरात देण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकरता एकाच कार्यालयाला तशी नेमप्लेट लावण्यात आली आहे. या कार्यालयाला एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते मात्र काही क्षणात ती पाटी काढून टाकण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात पहिल्या कॅबिनला अजित पवार यांचं नाव, दुसऱ्या कॅबिनला अनिल पाटील यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यांच्या नेमप्लेट तशाच ठेवण्यात आल्या आहेत मात्र जितेंद्र आव्हाड यांची नेमप्लेट असलेल्या तिसऱ्या कॅबिन बाहेरची पाटी हटवण्यात आली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना हा दणका असल्याची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.