शरद पवार यांनी पुण्यातील 'त्या' रिक्षावाल्याचं का केलं कौतुक? कारण काय? पाहा व्हिडीओ...

शरद पवार यांनी पुण्यातील ‘त्या’ रिक्षावाल्याचं का केलं कौतुक? कारण काय? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Jun 30, 2023 | 9:03 AM

पुण्यातील एका रिक्षाचालकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा रिक्षाचालक शरद पवार यांचा चाहता आहे. या रिक्षाचालकाने कोरोना काळात आपल्या रिक्षावर शरद पवार यांचा फोटो लावून गरजूंना विनामूल्य सेवा पुरवली आहे.

पुणे : पुण्यातील एका रिक्षाचालकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा रिक्षाचालक शरद पवार यांचा चाहता आहे. या रिक्षाचालकाने कोरोना काळात आपल्या रिक्षावर शरद पवार यांचा फोटो लावून गरजूंना विनामूल्य सेवा पुरवली आहे. शरद पवार यांना ही गोष्ट कळताच त्यांनी या रिक्षाचालकाची भेट घेत त्याचं कौतुक केलं आहे. यावेळी शरद पवार यांनी रिक्षा चालकाला पेट्रोल स्वत:च्या खिशातून भरत होतास का? असा सवाल केला. त्यावर रिक्षाचालक म्हणाला, होय मी स्वतःच्या खिशातून पेट्रोल टाकत होतो. यावर शरद पवार यांनी खूप पैसे आहेत तुझ्याकडे असं म्हणत मस्करी केली.

Published on: Jun 30, 2023 09:03 AM