शरद पवार यांच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर अनिल पाटील यांना धडकी, काय केलं पवारांनी मोठं वक्तव्य?
२०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतरे यांना इशारा दिला होता. तसा इशारा शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांना दिलाय. हिवाळी अधिवेशनानंतर दोन्ही पवार एकत्र येतील. असं अनिल पाटलांनी म्हटलं. याबद्दल शरद पवारांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा केला.
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ | २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतरे यांना इशारा दिला होता. तसाच इशारा आता शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांना दिलाय. पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत. याची काळजी आम्ही घेऊ. शरद पवार यांच्या या वक्तव्याने अजित पवार गटातील आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांना धडकी भरवणारं आहे. पवार जे बोलतात नेमकं त्या विरोधात करतात अशी त्यांची ख्याती. पण पवारांचं अनिल पाटलांबद्दलच हे वक्तव्य म्हणजे अजित पवार यांनाच इशारा आहे का? असा सवाल केला जातोय. तर हिवाळी अधिवेशनानंतर दोन्ही पवार एकत्र आलेले दिसतील. असं अनिल पाटील यांनी म्हटलं. म्हाढा दौऱ्यावर असताना याबद्दल शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा केला. बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Nov 17, 2023 11:49 AM
Latest Videos