बीडमध्ये मोठी खेळी, लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
बीडमध्ये अजित पवार गटातील बजरंग सोनवणे हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. यासोबत पुढील दोन दिवसात म्हणजेच २२ मार्चला विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बारामतीमध्ये शरद पवार गटात आपला पक्ष प्रवेश करणार
मुंबई, २० मार्च २०२४ : बीडमध्ये शरद पवार यांनी मोठी खेळी केल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमध्ये अजित पवार गटातील बजरंग सोनवणे हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. यासोबत पुढील दोन दिवसात म्हणजेच २२ मार्चला विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बारामतीमध्ये शरद पवार गटात आपला पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ज्योती मेटे यांचा पक्षप्रवेश लांबला आहे. ज्योती मेटे या आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर बीडमधून लोकसभेसाठी अजित पवार गटातील बजरंग सोनवणे हे देखील इच्छुक आहे. ‘बीड मतदारसंघातील लोकसभा निवडणूकीचा उमेदवार होण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. मी उमेदवारीदेखील मागितली नाही. शरद पवार यांच्यासोबत एकत्र काम करण्याची माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा होती ‘, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले.