Sharad Pawar : दोन नंबरची मते भाजपला जास्त मिळाली, शरद पवारांची टीका

Sharad Pawar : दोन नंबरची मते भाजपला जास्त मिळाली, शरद पवारांची टीका

| Updated on: Jun 11, 2022 | 12:13 PM

राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता राज्यात प्रचंड राजकारण तापलंय.

मुंबई:  राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) दोन नंबरची मते भाजपला जास्त मिळाली, अशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर केली आहे. आज पहाटे निकाल आला. यानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू केली. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानं ते शिवसेनेच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. निकाल आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. यापूर्वी अनेकवेळा घेडेबाजाराचाही आरोप करण्यात आलाय. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे टीका करताना दिसले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही. पण त्यात गंमती झाल्या आहेत, असं शरद पवार म्हणालेत.

Published on: Jun 11, 2022 12:13 PM