Sharad Pawar: भाजप त्याच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवते- शरद पवार
पंजाबमधला अकाली दल हा भाजपचा मित्र पक्ष असलेला पक्ष जवळ जवळ संपुष्टात आलेला आहे असेही पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या बाबतीतही असेच घडले असून शिवसेनेत फूट पाडण्यात आली आहे आणि त्याला एकनाथ शिंदे यांची मदत झाली असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
बिहारमध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडीचा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप त्यांच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवते हाच नितीश कुमार यांचाही अनुभव असल्याचे पवार म्हणाले. सगळे पक्ष संपतील आणि भाजप हा एकाच पक्ष शिल्लक असेल असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची आठवणही शरद पवार यांनी यावेळी करून दिली. पंजाबमधला अकाली दल हा भाजपचा मित्र पक्ष असलेला पक्ष जवळ जवळ संपुष्टात आलेला आहे असेही पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या बाबतीतही असेच घडले असून शिवसेनेत फूट पाडण्यात आली आहे आणि त्याला एकनाथ शिंदे यांची मदत झाली असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.