शरद पवार राजकारणातून निवृत्त कधी होणार? वयाच्या टीकेसह निवृत्तीवर परखड भाष्य
वयाच्या 84 व्या वर्षीही शरद पवार राजकारणात सक्रीय आहे. पण अजून निवृत्त होण्याचं नाव घेत नाही, अशी टीका अजित पवार यांनी शरद पवारांवर केली होती. यावर खुद्द शरद पवार यांनीच भाष्य केले आहे. कधी होणार राजकारणातून निवृत्त आणि अजित पवार यांच्या टीकेवर काय म्हणाले शरद पवार?
पुणे, ९ जानेवारी २०२४ : वयाच्या 84 व्या वर्षीही शरद पवार राजकारणात सक्रीय आहे. पण अजून निवृत्त होण्याचं नाव घेत नाही, अशी टीका अजित पवार यांनी शरद पवारांवर केली होती. यावर खुद्द शरद पवार यांनीच भाष्य केले आहे. शरद पवार मी निवडणूक लढणार नाही हे जाहीरपणे सांगितलं आहे. त्यावरून सगळं स्पष्ट होतय. हे जाहीर केल्यानंतर पुन्हा त्याच मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज नाही. राज्यसभेचा माझा कार्यकाळ हा एक-दोन वर्ष राहिला आहे. तो अर्धवट सोडू का? मला पक्षाने राज्यसभेत पाठवलं. ते अर्धवट सोडून कसं थांबू? जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत मी काम करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय. तर अजित पवार यांच्या या विधानावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी बोलू इच्छित नाही. माझ्या विरोधकांनीही कधी हा विषय काढला नाही. वयाचा हिशोब काढणं त्यांना योग्य वाटत असेल तर ते बोलू शकतात, असं स्पष्टच शरद पवार म्हणाले.