शरद पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर म्हणाले, ‘राज ठाकरेंना दुर्लक्ष करणं…’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांनी आपण जातीयवादी असल्याचे एक उदाहरण तरी द्या, असे म्हटले होते. यानंतर राज ठाकरे यांनी उदाहरण देत थेट आव्हान दिले. यावरच शरद पवारांनी पलटवार केलाय.
शरद पवार हे आपण जातीवादी असल्याचे एक तरी उदाहरण द्या, असे म्हटले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी उदाहरण देत शरद पवारांनाच आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, एक उदाहरण सांगतो. सोपे उदाहरण आहे. त्याचे फुटेज सर्वांकडे आहे. पुण्यात एका कार्यक्रमात छगन भुजबळांना पुण्यात पुणेरी पगडी घातली. पवारांनी ती काढली आणि ज्योतिराव फुले यांची पगडी घातली. ज्योतिराव फुले यांची पगडी घालण्याबाबत काही म्हणणे नाही. पण ही घालू नका, ही घाला. ते फुटेज पाहा. सत्काराच्या वेळी हे घडले होते, असे राज ठाकरे यांनी म्हटले आणि शरद पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला. दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार हे जातीयवादी असल्याचे पटवून दिल्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय. ‘काहीही बोलणं राज ठाकरेंचं वैशिष्ट्यं असल्याचे म्हणत त्यांना दुर्लक्ष करणे ही माझी भूमिका आहे’, असं शरद पवार म्हणाले.