काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी केला निर्धार; म्हणाले,’कोणत्याही परिस्थितीत आपण…’
VIDEO | काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी मांडली भूमिका, शरद पवार यांचं ठरलंय...पण नेमकं काय म्हणाले?
मुंबई, 29 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या या निर्णयानंतर अजित दादांनी केलेल्या बंडामागे शरद पवार यांचाच हात असल्याची चर्चा देशभर रंगल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी आपण भाजपच्या विरोधात लढा देणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या या कृतीनंतर शरद पवार यांनी मौन घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपला निर्धार व्यक्त केला आहे. ‘आपल्याला भाजपच्या विरोधात लढायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांची साथ सोडायची नाही, देशातील विरोधकांची आघाडी ‘INDIA’ च्या बैठकीचं चांगलं नियोजन करा असं म्हणत शरद पवार यांनी सूचनाही केल्या आहे. काल झालेल्या मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.