Sharad Pawar NCP : विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरूद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत काही ठिकाणी होताना दिसणार आहे. अशातच शरद पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात शरद पवार यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट राष्ट्रवादीच्या ५० ते ६० जागा निवडून येतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. तर जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत, असा मोठा दावाही शरद पवारांनी केला. असं वक्तव्य करत शरद पवार यांनी अजित पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर हा खोचक निशाणा साधला आहे. ‘जे लोक पक्ष सोडून गेलेत ते पुन्हा कधी निवडून आलेच नाहीत. माझ्यासोबत २ ते ३ वेळा झालंय. लोक निवडून येतात आणि पक्ष सोडून जातात. जे सोडून गेले त्यांची संख्या ४५ इतकी होती. निवडून आले एका विचारावर आणि नंतर सोडून गेले हे लोकांना पसंत पडत नाही.’, असं स्पष्टपणे शरद पवार म्हणाले तर यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालात ५० ते ६० उमेदवार निवडून येतील यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.