ज्यांना 20 वर्ष दूध पाजलं तेच साप पवारांना डसले, अजित पवार गटावर कोणाचा घणाघात?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची नुकतीच जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे. या जनसन्मान यात्रेचा प्रसार आणि प्रचार गुलाबी रंगाचा वापर करून करण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी चांगलाच अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. अशातच मेहबूब शेख यांनी अजित पवार गटावर घणाघात केला आहे.
ज्यांना 20 वर्ष दूध पाजलं तेच साप पवारांना डसले आहे, असे म्हणत शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी अजित पवार यांच्या गटावर जोरदार घणाघात केला आहे. ‘आज नागपंचमीचा सण आहे. आजच्या दिवशी सापाला दूध पाजलं जात. पण शरद पवार यांनी ज्या सापाला २०-२० वर्ष दूध पाजलं त्याच सापांनी ज्यावेळी शरद पवारांना गरज होती. तेव्हा आपला फणा काढून पवार साहेबांना डसलं आहे.’, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे. तर यांनी शरद पवार यांचा पक्ष फोडला नाहीतर चोरला आहे. शरद पवार यांच्या शेवटच्या निवडणुकीच्या यांनी वाट पाहिली. तुम्ही कसली जनसन्मान यात्रा काढताय? ज्यांचा अपमान तुम्ही केलाय, असं म्हणत मेहबूब शेख यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
Published on: Aug 09, 2024 05:46 PM
Latest Videos