अजित पवारांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?

अजित पवारांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?

| Updated on: Apr 18, 2024 | 4:27 PM

आम्हाला कचा कचा कचा बटण दाबून मतदान करा, पाहिजे तेवढा भरघोस निधी देतो हे अजित पवार यांनी इंदापूरातील एका प्रचारसभेत बोलताना हे वक्तव्य केले आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, शरद पवार गटातील नेत्याची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदारांना पैशांचं अमिष दाखवत आहेत. अजित पवार यांनी कायद्याचं आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शरद पवार गटाचे नेते महेश तपासे यांनी केली आहे. आम्हाला कचा कचा कचा बटण दाबून मतदान करा, पाहिजे तेवढा भरघोस निधी देतो हे अजित पवार यांनी इंदापूरातील एका प्रचारसभेत बोलताना हे वक्तव्य केले आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. अजित पवार हे मतदारांना पैशांचं अमिष दाखवत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असेही महेश तपासे म्हणाले. अजित पवारांनी मतदारांना निधीचे प्रलोभन दाखवून मतदान मागितले आहे. हा एक कायदेशीर गुन्हा आहे आणि हा गुन्हा अजित पवारांनी केलाय. निवडणूक आयोगाने तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Apr 18, 2024 04:27 PM