काल जे मी काही बोललो ते…; टीकेची झोड उठल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची शरणागती
जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषद घेत म्हणाले, अनेकदा मी महाराष्ट्राला संबोधित करत असतो आणि मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण काल प्रभू श्रीरामांबद्दल जे बोललो ते ओघात बोलून गेलो.
मुंबई, ४ जानेवारी २०२४ : जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या वक्तव्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषद घेत म्हणाले, अनेकदा मी महाराष्ट्राला संबोधित करत असतो आणि मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण काल प्रभू श्रीरामांबद्दल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. प्रभू श्रीराम ज्याला महाराष्ट्रात राम कृष्णहरी म्हटलं जातं. जो पांडूरंग आहे तोच राम आहे. त्या रामाबद्दल बोलत असताना सांगितलं की, ते मांसाहारी होते, असं वक्तव्य केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. मात्र जे याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्यासाठी सांगतो, वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. त्यातल्या अयोध्या कंदातील सर्ग 52 आणि श्लोक 102 यात हा उल्लेख आहे. मात्र मला हा वाद वाढवायचा नाही म्हणून मी हे वाचून दाखवत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.