भाषणाची वेळ आली की तुम्ही नेमके बाथरूममध्ये पळायचेत…जितेंद्र आव्हाड यांचा अजितदादांना टोला
'हे तुमचे लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. आता आम्हाला सांगावं लागतील. जेव्हा दिल्लीत भाषणाची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरुममध्ये...का? जेव्हा शरद पवार यांची प्रसिद्धी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालून पिन मारुन पंचायत करुन टाकायचे, राजीनामा द्यायचे'
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : “आमच्या पोटात काय दुखतंय? तुम्ही कायदेशीररित्या निवडणूक लढवायला पाहिजे होती. तुम्ही तर स्टेजवरुन नेहमी पळून जायचे. भाषणाची वेळ आली की नेमके तुम्ही बाथरुममध्ये असायचे. कारण तुम्हाला हिंदी बोलायला येत नाही. इंग्रजी बोलता येत नाही. हे तुमचे लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. आता आम्हाला सांगावं लागतील. जेव्हा दिल्लीत भाषणाची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरुममध्ये…का? जेव्हा शरद पवार यांची प्रसिद्धी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालून पिन मारुन पंचायत करुन टाकायचे, राजीनामा द्यायचे. काहीतरी वेगळं विचित्र करायचे. एमएससी बँकमध्ये तुम्ही केलेले लोच्चे, आलं शरद पवार यांच्यावरती आणि मग तुम्ही दुखं: व्यक्त करत राजीनामा दिला. मग कशाला नाटकं केली?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला तर तुम्हाला चार वेळा जे उपमुख्यमंत्रीपद मिळालं ते केवळ शरद पवार यांच्यामुळे मिळालं. याचे उपकार तर ठेवा. कृतज्ञता तर व्यक्त करा. इतका कृतघ्न माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाही, असे म्हणत आव्हाडांनी जोरदार हल्लाबोल केला.