Rohit Pawar : कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात… रोहित पवार यांनी कुणाला लगावला खोचक टोला?
VIDEO | तर लवकरात लवकर मंत्रिपद मिळावं ही अपेक्षा आहे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना खोचक टोला लगावला आहे. कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात, असे म्हणत रोहित पवार यांनी पुण्यातून नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला
पुणे, २२ ऑक्टोबर २०२३ | कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात, असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना खोचक टोला लगावला आहे. तर लवकरात लवकर मंत्रिपद मिळावं ही अपेक्षा आहे, असे रोहित पवार म्हणाले. ‘कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात, त्यांच्या भूमिकेवर आणि मतावर किती बोलावं. त्यांना जे काम दिलंय ते चांगलं करताय. ते माझे मित्र आहेत त्यांना शुभेच्छा त्यांनी त्यांचं काम करत रहावं.’, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली तर अपेक्षा करतो प्रर्थना करतो लवकरात लवकर तुम्हाला मंत्रिपद मिळावं. कारण यासाठी तुमचे परिश्रम, विचार तुम्ही वेगळ्या पातळीवर राजकारण घेऊन जात आहात. तरीही तुम्हाला मंत्रिपद मिळत नसेल तर तुम्ही पदासाठी लढत रहा आम्ही युवकांच्या हितासाठी लढत राहू., असेही रोहित पवार यांनी म्हणत नितेश राणेंवर निशाणा साधला.
Published on: Oct 22, 2023 08:24 AM
Latest Videos