आज एक पाकीट आलं… ‘मालक’मंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा ट्विटनं कुणावर निशाणा?
नगर दक्षिणमध्ये उत्तरेतून आज एक पाकीट आल्याचं म्हणत रोहित पवार यांनी ट्वीट करून सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. या ट्वीटमध्ये मालक मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याचं निवेदन करण्यात आल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवारांच्या ट्वीटनं चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट केल्यानं चर्चांना उधाण आले आहे. नगर दक्षिणमध्ये उत्तरेतून आज एक पाकीट आल्याचं म्हणत रोहित पवार यांनी ट्वीट करून सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. या ट्वीटमध्ये मालक मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याचं निवेदन करण्यात आल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. नगर दक्षिण मतदारसंघात आज ‘राजा’ असलेल्या प्रत्येकाच्या नावाने उत्तरेतून एक पाकीट आलं असून यात थोडा ‘प्रसाद’ आणि ‘मालक’मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याबाबतचं निवेदन आहे. गम्मत म्हणजे अनेक गावांमध्ये स्वाभिमानी नागरिकांनी हा प्रसाद घ्यायलाच नकार दिला तर काही गावांत ‘यंत्रणे’ने दिलेल्या प्रसादापैकी अर्धा प्रसाद गावातल्या वाढप्यानेच खाऊन टाकला… आता ‘प्रसादात’ही आडवा हात मारला जात असेल तर आजचा ‘राजा’ कसा उदार होणार? असा सवाल करत रोहित पवार यांनी हा हल्लाबोल ट्वीटच्या माध्यमातून केल्याचे पाहायला मिळत आहे.