Rohit Pawar : ...तर राज ठाकरे यांनी आमच्या सोबत यावं, रोहित पवार यांनी नेमकं काय केलं आवाहन?

Rohit Pawar : …तर राज ठाकरे यांनी आमच्या सोबत यावं, रोहित पवार यांनी नेमकं काय केलं आवाहन?

| Updated on: Oct 20, 2023 | 4:45 PM

VIDEO | महाविकास आघाडीच्या बाजूने उभे रहावे, असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना आवाहन केले. भाजपला मदत करायची का? संविधानाला मदत करायची यावर विचार करावा, जे पक्ष मतं कापतात त्याचा फायदा भाजपला होत असतो, असे रोहित पवार यांनी म्हटले.

पुणे, २० ऑक्टोबर २०२३ | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत आता मनसेने देखील बारामतीमध्ये तयारी सुरू केली आहे. तर बारामतीमध्ये मध्यवर्ती कार्यालयाचे राज ठाकरे यांनी उद्घाटन केले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी तयारीला लागण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना आवाहन केले आहे. रोहित पवार म्हणाले, जर राज ठाकरे यांना संविधान टिकलं पाहिजे, असं वाटत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने उभे रहावे, त्यांनी भाजपला मदत करायची? की संविधानाला मदत करायची? यावर विचार करावा, जे पक्ष मतं कापतात त्याचा फायदा भाजपला होत असतो, त्यांनी इंडियाच्या आणि महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा, असे म्हणत राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत येण्याचं रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे आवाहन केलं आहे.

Published on: Oct 20, 2023 04:44 PM