Shashikant Shinde : … अन्यथा उद्रेक होईल, ‘या’ आमदाराचा सरकारला थेट इशारा
VIDEO | मनोज जरांगे यांचं बरं वाईट होऊ नये, असे वाटत असेल तर लवकर निर्णय घ्या, असे आवाहन करत शरद पवार गटातील आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्य सरकार जाणीवपूर्वक त्याबाबत निर्णय घेण्यात वेळकाढूणा करत आहे, शशिकांत शिंदे यांनी आरोप केला
सातारा, २९ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षण हा सर्वसामान्यांच्या मराठ्यांच्या निगडीत असलेला जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा असून राज्य सरकार जाणीवपूर्वक त्याबाबत निर्णय घेण्यात वेळकाढूणा करत आहे, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलाय. तर याविषयी आम्ही जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे विधानसभा, विधान परिषद आणि रस्त्यावर देखील सरकारला जाब विचारणार आहोत. राज्य सरकारने वेळीच याबाबतीत निर्णय घ्यावा अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांचं बरं वाईट होऊ नये, असे वाटत असेल तर लवकर निर्णय घ्या, असे आवाहनही आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
Published on: Oct 29, 2023 12:02 PM
Latest Videos