‘कारण टायगर अभी जिंदा है…’, अमोल कोल्हेंची भरसभेतून फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीदेखील शरद पवार गटात आज प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील भाषण केलं. बघा काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज फलटणमध्ये मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्यासह सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीदेखील अजित पवार गटाची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील भाषण केलं. “फलटणमध्ये गेल्यानंतर तुतारी वाजणार नाही हे जमत नव्हतं. पण तुम्ही ते जमवलं त्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन. फलटणमध्ये नव्हे तर संपूर्ण गावागावात गेल्यानंतर सांगितले जाते तुतारी हाती घ्या. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. हरियाणासारखे महाराष्ट्रात घडू शकत नाही. कारण टायगर अभी यहाँ खडा हैं. मागील वर्षी 2 जुलैला घेतलेला निर्णय हा मारून मुटकुन घेतलेला होता. मात्र आता मनापासून निर्णय घेतला आहे. दिल्लीपतीसमोर गुडघे टेकणे बास, आता निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हा झुकणार नाही आणि स्वाभिमान विकणार नाही”, असं अमोल कोल्हे म्हणाले.