पुण्यात अनेक घटना घडल्या पण पालकमंत्री कुठे? सुप्रिया सुळेंचा घणाघात

पुण्यात अनेक घटना घडल्या पण पालकमंत्री कुठे? सुप्रिया सुळेंचा घणाघात

| Updated on: May 23, 2024 | 5:14 PM

अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली. दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्थाला उडवणाऱ्या वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे. या प्रकऱणावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय

विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली. दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्थाला उडवणाऱ्या वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे. या प्रकऱणावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, यावर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या आहेत पण पुण्याचे पालकमंत्री कुठे? असा सवाल शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला असून अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तर देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाबद्दल बोलत होते? राजकीय दबाव नेमका कुणाचा? असा सवाल करत फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर कुणी फोन केला? कुणामुळे जामीन मिळाला हे देवेंद्र फडणवीसांनी सांगाव, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Published on: May 23, 2024 05:14 PM