आत्याकडून भाच्याला गोड शुभेच्छा! अजित पवारांच्या मुलाच्या स्पेशल दिनी सुप्रिया सुळे म्हणाल्या...

आत्याकडून भाच्याला गोड शुभेच्छा! अजित पवारांच्या मुलाच्या स्पेशल दिनी सुप्रिया सुळे म्हणाल्या…

| Updated on: Mar 21, 2024 | 4:13 PM

पुण्यातील भोर येथे सुप्रिया सुळे दौऱ्यावर असताना त्यांनी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. पार्थ पवार यांचा आज वाढदिवस असल्याने आत्या या नात्याने सुप्रिया सुळे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या भाच्याला दिल्या आहेत.

पुणे, भोर २१ मार्च २०२४ : राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फूटीनंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, पवार कुटुंबीयांमध्ये वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाही. दरम्यान, याचाच प्रत्यय आज पाहायला मिळाला. पुण्यातील भोर येथे सुप्रिया सुळे दौऱ्यावर असताना त्यांनी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. पार्थ पवार यांचा आज वाढदिवस असल्याने आत्या या नात्याने सुप्रिया सुळे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या भाच्याला दिल्या आहेत. तुम जिओ हजारो साल..सालके के दिन हो पचास हजार.. हैप्पी बैर्थडे असं म्हणतं, सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अजित पवार यांना राष्ट्रवादीचं चिन्ह तर मिळालं मात्र अद्याप हे प्रकरण कोर्टात असल्याने घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असे लिहण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. यावर बोलताना सुप्रिया ताई म्हणाल्या, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवार साहेबांनी केलेली आहे, गेली पंचवीस वर्षे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतल हे अत्यंत दुर्दैवी आहे, म्हणूनच या सर्वांची सुनावणी व्हावी असे कोर्टाच्या मनात आलं असेल, असे म्हणत त्यांनी कोर्टाचे आभार मानले.

Published on: Mar 21, 2024 04:13 PM