Special Report | ‘राज’कारणावर भाजकडून स्तुती, मविआकडून टीकास्त्र
गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांच्या झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाना साधला.
गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांच्या झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाना साधला. या झालेल्या सभेत शरद पवार यांच्यावर त्यांनी जातीयवाद शरद पवारांना पाहिजे आहे अशी टीका करण्यात आली. राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर प्रतिनिशाना साधला. त्यांचे भाषण म्हणजे भाजपची मळमळ असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले तर शरद पवार यांनी भूमिगत असं विशेषण लावून टीका करणारे इतर वेळी कुठे जातात कळत नाही असा सवालही उपस्थित केला. तर छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना ईडीने बोलवलं काय आणि मनसेचं इंजिन दुसऱ्या ट्रॅकवर लगेच गेलं काय असं म्हणत कोहिनूर लगेच हलू लागली अशी टीका केली. यावेळी राज ठाकरे यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचेही म्हणण्यात आले.
Latest Videos