‘पक्षांतर केलं म्हणजे काय केलं? काही नाही’; शरद पवार यांचे अजित पवार गटावर हल्लाबोल

‘पक्षांतर केलं म्हणजे काय केलं? काही नाही’; शरद पवार यांचे अजित पवार गटावर हल्लाबोल

| Updated on: Aug 21, 2023 | 9:48 AM

अजित पवार आणि त्यांच्या बरोबर ३० एक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अजित पवार गटावर आता शरद पवार यांनी टीका करणं सुरू केलं आहे.

मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | शरद पवार यांच्याकडून आता अजित पवार आणि त्याच्या गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी त्यांच्या अनेक वक्तव्यातून ते स्पष्ट केलं आहे. तर राज्यात दोन आणि मराठवाड्यात एक सभा घेत थेट अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे. त्याचदरम्यान आता शरद पवार यांनी, अलीकडे आपल्यातले काही लोक हे पक्षाबाहेर गेले आणि कारवाईच्या भीतीपोटी भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत अशी घणाघाती टीका अजित पवार गटावर केली आहे. तसेच पवार यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. तर भेकड प्रवृत्तीला जनता जागा दाखवेल असेही पवारांनी टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी पवार यांनी, काही सहकार्यांनी पक्षांतंर केलं. त्याचं असं म्हणणं आहे की, आम्ही गेलो. त्यातल्या बहुतेक लोकांच्यावर केंद्र सरकारने या ना त्या कारणांने ईडीची चौकशी सुरू केली होती. त्यानंतरच आपल्या काही सहकार्यांनी पक्षांतर केले. पक्षांतर केलं म्हणजे काय केलं? काही नाही. ते आज कुठलाही प्रश्न आला. की त्यांना भाजपच्या बाजूने बोलावं लागतं अशी देखील टीका केली आहे.

Published on: Aug 21, 2023 09:48 AM