‘मोदी सरकारमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जगातलं मार्केट बंद’; शरद पवार यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी मार्केट बंद ठेवले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यावरील निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात आता बंड पुकारत केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहेत.
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याला आता कुठं भाव मिळत होता. दोन पैसे त्यांना मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरणात मोठा निर्णय घेतला. तर केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राज्याभरात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्राच्या या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे. पवार यांनी, शेतकऱ्याच्या कांद्याला मिळणारा भाव हा केंद्राच्या निर्णयानं बंद झाला असा घणाघात केला आहे. त्याचबरोबर कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये केलेल्या वाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधताना, मोदी सरकारमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक मार्केट बंद झालं असे देखील टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक

नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य

400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं

आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
