दंगलींवरून शरद पवार यांचा शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; 'अशा गोष्टींना प्रोत्साहन...'

दंगलींवरून शरद पवार यांचा शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; ‘अशा गोष्टींना प्रोत्साहन…’

| Updated on: Jun 07, 2023 | 10:34 AM

संगमनेर आणि कोल्हापूर येथे जातीय तेढ निर्माण होतील अशा घटना घडल्या. त्यामुळे अशा घटनांना जाणून बूजन अभय दिलं जात आहे का? असा सवाल आता अनेकांच्या मनात पडला आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर यावरून टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात वारंवार धार्मिक-जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. गेल्या काही महिन्यापुर्वी छत्रपती संभाजीनगर, नगर आणि इतर जिल्ह्यात अनेत ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या. त्यानंतर या घटना थांबल्या अशा वाटत असतानाच आता पुन्हा एकदा संगमनेर आणि कोल्हापूर येथे जातीय तेढ निर्माण होतील अशा घटना घडल्या. त्यामुळे अशा घटनांना जाणून बूजन अभय दिलं जात आहे का? असा सवाल आता अनेकांच्या मनात पडला आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर यावरून टीका केली आहे. तर शिंदे-फडणवीसांवर आरोप करताना, राज्य सरकारच अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे असं म्हटलं आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी संगमनेर आणि कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोवरून निर्माण झालेला तणाव भाष्य केलं. तसेच पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. मात्र, आता या परत आहेत. हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर औरंगाबादमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायची काय गरज? पुण्यात कोणाला याविषयी पडले आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून आणखी तणाव निर्माण कसा होईल, हे पाहिले जात आहे.

Published on: Jun 07, 2023 10:34 AM