Nawab Malik | देशातील सर्व विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी पवारांनी घेतलीय : नवाब मलिक

Nawab Malik | देशातील सर्व विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी पवारांनी घेतलीय : नवाब मलिक

| Updated on: Dec 02, 2021 | 5:32 PM

ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या, त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. कारण देशातील सर्व विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी शरद पवारांनी घेतली आहे, असे प्रतिपादन नवाब मलिक यांनी केले.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. पटेल यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी होण्याची कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी देशाची राजधानी होऊ शकत नाही. मुंबई हीच देशाची आर्थिक राजधानी राहील हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले. गुजरातच्या आनंदीबेन आल्या होत्या. आता पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री आले आहेत. प्रत्येक लोक येतात. परंतु, कधी कटकारस्थान करुन महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे काम कुणी केले नाही, अशी टीका मलिक यांनी केली. ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या, त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. कारण देशातील सर्व विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी शरद पवारांनी घेतली आहे, असे प्रतिपादन नवाब मलिक यांनी केले.