Special Report | शरद पवार यांची निवृत्ती मागे, बडे नेते पत्रकार परिषदेत पण अजित दादाच नव्हते? काय आहे कारण?
VIDEO | शरद पवार यांची निवृत्ती मागे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते पत्रकार परिषदेत...पण अजित दादा मात्र 'देवगिरी'वरच... बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षातच अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र समितीच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. तरीही चर्चा मात्र अजित पवार यांच्यावरून सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेत बडे नेते नसताना अजित पवार कुठे दिसलेच नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच… निवृत्तीची घोषणा करताना शरद पवार यांनी समिती स्थापन केली. पण त्याच समितीने त्यांच्या राजीनामा नामंजूर केला आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम रहावं अशी विनंती केली. २ मे रोजी शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा करत राजीनामा दिला आणि ५ मे रोजी राष्ट्रवादीच्या समितीनं राजीनामा फेटाळला. त्याच बरोबर त्याचदिवशी कार्याध्यक्षपदाचा प्रस्तावही फेटाळला आणि त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. यानंतर शरद पवार यांनी ज्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथून निवृत्तीची घोषण केली होती त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते होते मात्र अजित पवारच गैरहजर असल्याचे नवी चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे..काय आहे अजितदादा गैरहजर असण्याचं कारण बघा स्पेशल रिपोर्ट