Sharad Pawar : या निकालाने मला धक्का बसलेला नाही,  शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar : या निकालाने मला धक्का बसलेला नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 11, 2022 | 11:47 AM

राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता राज्यात प्रचंड राजकारण तापलंय. यावर दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मुंबई : राज्यसभा निवडणुक (Rajya Sabha Election) निकालाच्या लांबणीनंतर पहाटे अखेर निकाल लागला. यामध्ये शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना भाजपवर जोरदार टीका केली. आधी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही टीका केली आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘या निकालाने मला धक्का बसलेला नाही. आमच्या आघाडीचा कोटा ठरलेला होता. त्यात काही फरक पडलेला नाही. उलट भाजपचं एक मत आम्हाला अधिक पडलं. भाजप समर्थित अपक्ष आमदाराने आम्हाला हे एक अतिरिक्त मत दिलं. मला सांगून हे मत देण्यात आलं, असंही पवारांनी सांगितलं. दरम्यान, शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाल्यानं मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय.

Published on: Jun 11, 2022 11:47 AM