Sharad Pawar : बंडखोरांना घाम फोडणारी बातमी! शरद पवार पुन्हा मैदानात? आता कोणता गेम? कोणाचा गेम?
यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्याला कोणाबद्दल काही बोलायचे नाही. पण आपण पुन्हा लोकांना भेटून त्यांची माफी मागू पुन्हा नव्या दमाने हा पक्ष बांधू असे म्हणत साताऱ्यात शंख फुकला होता. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये पहिली एंन्ट्री करत छगन भूजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेतली होती.
सातारा, 29 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. त्यानंतर त्यांनी थेट आपल्या ८ आमदारांसह शपथविधीच्या कार्यकर्मात जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्याला कोणाबद्दल काही बोलायचे नाही. पण आपण पुन्हा लोकांना भेटून त्यांची माफी मागू पुन्हा नव्या दमाने हा पक्ष बांधू असे म्हणत साताऱ्यात शंख फुकला होता. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये पहिली एंन्ट्री करत छगन भूजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेतली होती. यानंतर अजित पवार गटाने एका मंत्री सोबत आणि एकदा फक्त आमदार जाऊन पवार यांची भेट घेतली होती. तर राष्ट्रवादी एकसंघ रहावी म्हणून पवार यांनी सोबत यावं अशी विनंती केली होती. त्यानंतर पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. तर ते इंडियाच्या बंगळुरू येथील बैठकिला गेले होते. तर आपण भाजपबरोबर जाणार नाही असा संदेश दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पवार यांनी संकेत दिले आहे. आता पुन्हा एकदा पवार हे मैदानात उतरणार असून ते राज्याच्या दौऱ्याला सुरूवात करणार आहेत अशी माहिती मिळत आहे. तर ते १६ ऑगस्टपासून दौऱ्याला सुरूवात करतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.