राज्यात शरद पवार यांचं सरकार येणार? अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले शरद पवार?

राज्यात शरद पवार यांचं सरकार येणार? अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले शरद पवार?

| Updated on: Sep 30, 2024 | 5:14 PM

सध्या महायुतीत आणि महाविकासआघाडीत जागावाटपाबद्दल चर्चा सुरु आहेत. त्यातच आता शरद पवारांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. अशातच प्रत्येक राजकीय पक्षांनी आपली कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शऱद पवारांनी एक बैठक घेतली. या बैठकीतील अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं. राज्यात आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी आज केलं. अनौपचारिक गप्पा सुरू असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागांवरही भाष्य केलं. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे. तशा जागांवर अदला-बदली होऊ शकते असेही शरद पवार यांनी म्हटले. तर जेवढ्या जागा निवडून येऊ शकतात, तेवढया जागा प्रत्येक पक्षाला जातील. आम्ही जसं सरकार आणण्याची काळजी घेत आहोत, तसं सत्ताधारीही घेत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आमदार निवडून आल्यानंतर घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले. विधानसभेला आमचं तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह राहिल. अमित शाह म्हणाले बूथ लेव्हलवरील कार्यकर्ता फोडा पण अमित शाहांनी महाराष्ट्रात आणखी सभा घ्याव्यात म्हणजे आम्हाला त्याचा फायदा होईल, असे शरद पवार म्हणाले.

Published on: Sep 30, 2024 05:14 PM