Jitendra Awhad यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, ‘… न बोललेलं बरं’
VIDEO | जितेंद्र आव्हाड यांच्यासंबंधित विचारलेल्या प्रश्नावर अजितदादा म्हणाले. 'वेदना आणि जितेंद्र आव्हाड यांचं कधी जुळतं का? न बोललेलं बरं', असं पवार म्हणाले. अजित पवार गटाने केलेल्या युक्तिवादावर शरद पवार यांच्या गटाने आक्षेप नोंदवला आहे. या युक्तिवाद आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली.
नाशिक, ७ ऑक्टोबर २०२३ | केंद्रीय निवडणूक आयोगात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अजित पवार आणि शरद पवार गटाने जोरदार युक्तिवाद केला. या सुनावणीवेळी अजित पवार गटानं शरद पवार गटावर युक्तीवादात गंभीर आरोप केले. शरद पवार हे पक्षात हुकूमशाह सारखे वागतात. ते आपली मनमानी करतात. असा आरोप अजित पवार गटाकडून युक्तिवादात करण्यात आला. अजित पवार गटाने केलेल्या युक्तिवादावर शरद पवार यांच्या गटाने आक्षेप नोंदवला आहे. अजित पवार गटाचा हा युक्तिवाद ऐकून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कालच्या सुनावणीवर भूमिका मांडण्यासाठी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, काल निवडणूक आयोगात माझ्या डोळ्यात अश्रू आल्याचे त्यांनी म्हटले. तर यावरच अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजितदादा म्हणाले, ‘वेदना आणि जितेंद्र आव्हाड यांचं कधी जुळतं का? न बोललेलं बरं’, असं पवार म्हणाले.