काका का? पण महाराष्ट्राला ठाऊक... कवितेतून अजित पवार यांच्या 'त्या' टीकेवर अमोल कोल्हे यांचं प्रत्युत्तर

काका का? पण महाराष्ट्राला ठाऊक… कवितेतून अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेवर अमोल कोल्हे यांचं प्रत्युत्तर

| Updated on: Feb 15, 2024 | 6:15 PM

आता पापापा सारखं काकाका असं करावं लागणार असं अजित पवार यांनी वक्तव्य करत शरद पवार गटाला टोला लगावला होता. तर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जशासतसं उत्तर दिलंय. कुणीतरी म्हणालं काका का? जनता म्हणाली काका चं का? असा खोचक सवाल करत ते म्हणाले...

मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : आता पापापा सारखं काकाका असं करावं लागणार असं अजित पवार यांनी वक्तव्य करत शरद पवार गटाला टोला लगावला होता. त्याला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जशासतसं उत्तर दिलंय. कुणीतरी म्हणालं काका का? जनता म्हणाली काका चं का? असा खोचक सवाल करत ते म्हणाले, पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का? असे म्हणत त्यांनी कवितेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोणीतरी म्हणालं काका का? जनता म्हणाली अजूनही काकाच का? पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं तरीही अजूनही काका का? बोलता धनी बोलवता धनी पुरेपूर जाणतो. काका का? पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का? कारण काका फक्त माणूस नसतो. काका फक्त नेता नसतो. 50 वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून वाहणारा विचार असतो. काटेवाडीच्या का पासून कारगिलच्या का पर्यंत काकाच असतो.’, असे कोल्हे कवितेतून म्हणाले.

Published on: Feb 15, 2024 06:15 PM