भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? देवेंद्र फडणवीसांची का घेतली अचानक भेट?

भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? देवेंद्र फडणवीसांची का घेतली अचानक भेट?

| Updated on: Dec 03, 2024 | 4:10 PM

बाळ्यामामा म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर बाळ्यामामा म्हात्रे हे शरद पवार यांची साथ सोडणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याच होत्या. पण बाळ्यामामा म्हात्रे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भिवंडी खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे बाळ्यामामा म्हात्रे यांनी मुंबईतील सागर बंगल्यावर दाखल होत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. बाळ्यामामा म्हात्रे हे शरद पवारांची साथ सोडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र बाळ्यामामा यांनी फडणवीसांची ही भेट नेमकी कशासाठी घेतली? याचं कारण त्यांनी सांगितलं आहे. ‘काल दुपारी मी देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक कारणासाठी भेटलो होतो. राजकीय विषय काहीही नव्हता. राजकीय विषय असेल तर दुपारी 2 वाजता गाडी घेऊन कोण जाईल का?, असं बाळ्यामामा म्हात्रे यांनी म्हटलं आणि चर्चांना पूर्णविराम दिलं. तर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना बाळ्या मामा असेही म्हणाले की, मी कोणाशीही भेटलो नाही. मीडियाने वेगवेगळे तर्क लावले आहेत. एकमेकांना भेटतो म्हणजे राजकारण असतं असं नाही. मी खासदार आहे आमदार देखील नाही. शरद पवार यांना सोडण्याचा काही प्रश्नच नाही. मी त्यांच्याच पक्षात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी काहीच तास शिल्लक असताना बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता बाळ्यामामा यांनीच यावर खुलासा केला आहे.

Published on: Dec 03, 2024 04:10 PM