एकनाथ खडसे यांची 8 दिवसांत घरवापसी होणार? नाथभाऊ भाजपमध्ये येणार?

एकनाथ खडसे यांची 8 दिवसांत घरवापसी होणार? नाथभाऊ भाजपमध्ये येणार?

| Updated on: Apr 04, 2024 | 11:42 AM

एकनाथ खडसे नुकतेच दिल्लीतून परतले आहेत. आपल्याला भाजपमध्ये जायचे असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन भाजपमध्ये जाईल जायचं झालं तर.. असं स्पष्टीकरण दिलं. दिल्ली दौऱ्यात एकनाथ खडसे यांनी भाजपच्या हायकंमाडसोबत बैठक झाल्याची माहिती आहे.

नाथाभाऊ पुन्हा भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. एकनाथ खडसे नुकतेच दिल्लीतून परतले आहेत. आपल्याला भाजपमध्ये जायचे असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन भाजपमध्ये जाईल जायचं झालं तर.. असं स्पष्टीकरण दिलं. दिल्ली दौऱ्यात एकनाथ खडसे यांनी भाजपच्या हायकंमाडसोबत बैठक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंची लवकरच भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे. तर त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. तर रावेरमधून त्यांना पुन्हा भाजपकडून लोकसभेचं तिकीटही दिलंय. तर तब्येतीचं कारण देत एकनाथ खडसे यांनी सुनेविरूद्ध लढण्यास नकार दिला. मात्र नाथाभाऊंनी भाजपमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला तर पक्षही त्यांचं स्वागत करेल, असं रक्षा खडसे म्हणाल्या. सध्या एकनाथ खडसे यांच्या दिल्ली दौऱ्याची जी चर्चा होतेय. बघा स्पेशल रिपोर्ट… नेमकी काय होतेय चर्चा… एकनाथ खडसे यांची पुन्हा होणार भाजपमध्ये घरवापसी?

Published on: Apr 04, 2024 11:42 AM