भेटता कसले, हिम्मत असेल तर राजीनामा द्या; नीट प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना खुलं आव्हान
नीट प्रकरणावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. नीट वरून एकतर राजीनामा मागा किंवा राजीनामा द्या,...
देशात सध्या नीट परीक्षा घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. नीट प्रकरणावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. नीट वरून एकतर राजीनामा मागा किंवा राजीनामा द्या, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर “अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई-पुण्यातील नीटच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे, असं ते म्हणाले. भेट कसली घेता? तुम्ही त्या सरकारमध्ये सहभागी आहात. तुमच्या मित्र पक्षांचे मंत्री आहेत. केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागा, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. “भेटता कसले, हिम्मत असेल तर राजीनामा द्या. वरच्या सरकारला वठणीवर आणा” असं जितेंद्र आव्हाड अजित पवारांना म्हणाले.