Ladki Bahin Yojana : अजित दादांनी योजनेचं नावचं बदललं, आता लाडकी… शरद पवार गटातील नेत्याचा आरोप
अजित पवार यांच्याकडून गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली. अजित पवार यांच्या घोषणेनंतर राज्यातील काना-कोपऱ्यातून महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावरूनच आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली. अजित पवार यांच्या घोषणेनंतर राज्यातील काना-कोपऱ्यातून महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावरूनच आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नाव बदललं की काय असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नावच बदलून टाकले, असा आरोप शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी केला. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदनगरच्या चार मतदारसंघात झळकलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री नाव वगळून माझी लाडकी बहीण योजना असाच उल्लेख करण्यात आल्याचे पाहायला मिळालं. तर यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका करत योजनेचं नावच बदलून टाकलं असं म्हणत निशाणा साधलाय. तर योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच असल्याचं हसन मुश्रीफ म्हणालेत.