रोहित पवारांचा विधानसभेच्या तोंडावर मोठा दावा, ‘महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये…’

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लोकांनी कितीही पैसा ओतला तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकं हे महाविकास आघाडी सोबत राहतील. तर महाविकास आघाडीच्या कमीत कमी १८० जागा विधानसभेला निवडून येतील असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केलात.

रोहित पवारांचा विधानसभेच्या तोंडावर मोठा दावा, 'महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये...'
| Updated on: Oct 24, 2024 | 1:41 PM

पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही गाडी सत्ताधारी आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. अशातच ५ कोटी त्यांचेच होते हे शहाजी बापूंनी स्विकारलं का? असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. तर एफआयरमध्ये शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांची नाव असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटलंय. ‘सहा ते सात गाड्या होत्या. त्यात पाच कोटी रूपये सापडले असे म्हणतात. पण त्यात २५ ते ३० कोटी रूपये होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी झाडं अन् डोंगर बघण्यासाठी जे आमदार गेले होते. भाजप असेल अजित पवार यांचा पक्ष, महायुती असेल हे एका मतदारसंघात ३० ते ४० कोटी रूपये खर्च करणार आहे.’ असा दावाच रोहित पवार यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, महायुतीचा जनतेवर विश्वास राहिलेला नाही. त्यांना असं वाटतं पैसा ओतला की स्वाभिमानी लोकांना विकत घेता येतं पण गेल्या लोकसभा निवडणुकीला जनतेने, महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकांनी दाखवून दिलं आहे की निष्ठा, विचार हे महत्त्वाचे असतात, असे रोहित पवार म्हणाले.

Follow us
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?.
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन.
रोहित पवारांचा मोठा दावा, 'महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये...'
रोहित पवारांचा मोठा दावा, 'महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये...'.
शंभूराज देसाईंना शिवसेनेकडून तिकीट तर मविआकडून 'हा' नेता अपक्ष लढणार?
शंभूराज देसाईंना शिवसेनेकडून तिकीट तर मविआकडून 'हा' नेता अपक्ष लढणार?.
माहिममध्ये तिहेरी लढत,मनसे-शिंदे-ठाकरे गटाच्या शिलेदारांमध्ये बिग फाईट
माहिममध्ये तिहेरी लढत,मनसे-शिंदे-ठाकरे गटाच्या शिलेदारांमध्ये बिग फाईट.
लोकसभेनंतर विधानसभेला बारामतीत घरातच लढाई, काका vs पुतण्या रिंगणात
लोकसभेनंतर विधानसभेला बारामतीत घरातच लढाई, काका vs पुतण्या रिंगणात.
मविआत 85 चा फॉर्म्युला, 270 जागांवर निघाला तोडगा तर काँग्रेसचं नुकसान?
मविआत 85 चा फॉर्म्युला, 270 जागांवर निघाला तोडगा तर काँग्रेसचं नुकसान?.
मनसेचं इंजिन धावणार की इतरांना रोखणार? 'या' जागांवर पहिल्यांदाच लढणार
मनसेचं इंजिन धावणार की इतरांना रोखणार? 'या' जागांवर पहिल्यांदाच लढणार.
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?.
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री.