जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर टीकेची झोड, शरद पवारांची भूमिका काय? पाहा…
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झालंय. या सगळ्या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. पाहा...
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झालंय. या सगळ्या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यात काहीही आक्षेपार्ह नाही. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे, असं शरद पवार म्हणालेत. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावरही पवार बोललेत. नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं. आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पटोलेंनी राजीनामा देताना सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही. एवढीच व्यथा आहे. पण आता तो विषय संपला आहे, असं शरद पवार म्हणालेत.
Latest Videos

कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...

राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
