AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete: मेटे नावाचं नेतृत्व उभं राहताना मी पाहिलंय, अकाली जाणं जिव्हारी लागणारं- शरद पवार

Vinayak Mete: मेटे नावाचं नेतृत्व उभं राहताना मी पाहिलंय, अकाली जाणं जिव्हारी लागणारं- शरद पवार

| Updated on: Aug 14, 2022 | 11:05 AM

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Shivsangram Vinayak Mete Passed Away) यांचं आज अपघातामध्ये निधन झालं. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. विनायक मेटे यांचं निधन वेदनादायी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. सकाळी उठवल्यानंतर पहिलीच बातमी मेटेंच्या निधनाची ऐकायला मिळाली. धक्का बसला, मेटे यांच्या निधनाचं वृत्त […]

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Shivsangram Vinayak Mete Passed Away) यांचं आज अपघातामध्ये निधन झालं. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. विनायक मेटे यांचं निधन वेदनादायी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. सकाळी उठवल्यानंतर पहिलीच बातमी मेटेंच्या निधनाची ऐकायला मिळाली. धक्का बसला, मेटे यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. गेली अनेक वर्ष विनायक मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली. ते मराठा आरक्षण प्रश्नावर कायम आवाज उठवायचे. मेटे यांनी मराठा समाजासाठी उल्लेखनीय काम केले. ते सामाजिक प्रश्नाची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असत.  त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.  विनायक मेटे यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.

Published on: Aug 14, 2022 11:03 AM