Sharad Pawar PC LIVE| याआधी माळीणमध्येही हीच परिस्थिती होती, पण गावाचं पुनर्वसन आदर्शवत झालं : पवार
सरकार आणि जनतेच्या मदतीने गाव पुन्हा उभं केलं. पुनर्वसन कसं करतात त्याचं उदाहरण आहे. त्या अनुषंगाने डोंगर कडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावाचंही पुनर्वसन केलं जाईल, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापुरातील महापुराचं पाणी ओसरायला आता सुरु झालं आहे. मात्र, झालेलं नुकसान न भरुन येणारं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात माळीण गावात अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी सरकार आणि जनतेच्या मदतीने गाव पुन्हा उभं केलं. पुनर्वसन कसं करतात त्याचं उदाहरण आहे. त्या अनुषंगाने डोंगर कडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावाचंही पुनर्वसन केलं जाईल, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
Published on: Jul 27, 2021 12:39 PM
Latest Videos