Sharad Pawar UNCUT | शरद पवार यांनी मांडला क्रिकेटचा संपूर्ण इतिहास

Sharad Pawar UNCUT | “शरद पवार यांनी मांडला क्रिकेटचा संपूर्ण इतिहास”

| Updated on: Sep 21, 2021 | 11:49 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात माजी क्रिकेपटू चंदू बोर्डे यांच्या कार्याच्या सन्मान समारंभात बोलत असताना त्यांनी साताऱ्यात खेळवलेल्या मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामन्याचा एक किस्सा सांगितला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात माजी क्रिकेपटू चंदू बोर्डे यांच्या कार्याच्या सन्मान समारंभात बोलत असताना त्यांनी साताऱ्यात खेळवलेल्या मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामन्याचा एक किस्सा सांगितला. शरद पवार म्हणाले की, आता क्रिकेटच्या मॅचेस फक्त मुंबई आणि पुण्यात होतात, मात्र तेव्हा एक मॅच साताऱ्यात खेळवण्यात आली होती. चंदू बोर्डे हे महाराष्ट्राच्या संघाचे कर्णधार होते. मुंबईची टीम तेव्हा जोरदार होती. त्यावेळी मुंबईच्या बलाढ्य टीमला हरवण्याचं काम चंदू बोर्डेंच्या टीमनं केलं होतं.

…आणि महेंद्रसिंह धोनी भारताचा कर्णधार झाला

शरद पवार म्हणाले की, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना सुरु असताना राहुल द्रविड माझ्याकडे आला. मला म्हणाला मला कॅप्टन्सीमधून मुक्त करा आणि दुसऱ्या कोणाला तरी कर्णधारपद द्या. मी सचिनला बोलावलं, तेव्हा सचिनदेखील नाही म्हणाला. तेव्हा त्याने मला एक नावं सूचवलं, ते नाव म्हणजे महेंद्रसिंह धोनी. तो झारखंडमधून आलाय म्हणून त्याला कमी समजू नका. महेंद्रसिंह धोनीच्या नावाची सूचना ही सचिन तेंडुलकरने केली होती. त्यानंतर धोनी पुढे भारतीय क्रिकेटला मोठं योगदान देणारा क्रिकेटर बनला.