Sharad Pawar on Loudspeaker : लक्ष विचलित करण्यासाठी धर्माचा आधार, मूळ मुद्दा महागाई, शरद पवारांचं थेट केंद्र सरकारवर बोट

Sharad Pawar on Loudspeaker : लक्ष विचलित करण्यासाठी धर्माचा आधार, मूळ मुद्दा महागाई, शरद पवारांचं थेट केंद्र सरकारवर बोट

| Updated on: May 10, 2022 | 12:17 PM

Sharad Pawar onLoudspeaker: शरद पवार यांनी यावेळी राजद्रोहाचं कलम नसावं याचा पुनरुच्चार केला. 124 अ कलमात राजद्रोहाचा खटला दाखल करण्याची तरतूद आहे.

कोल्हापूर: राज्यात भोंग्याचा (loudspeaker ban) मुद्दा तापलेला असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर (central government) बोट ठेवलं आहे. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना मुलभूत प्रश्न सोडवता येत नाहीत. त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी धर्माच्या मुद्द्याचा आधार घेतला जातोय, अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. शरद पवार यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भोंग्यासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. इश्यू महागाईचा आहे, बेकारीचा आहे. प्रत्येक गोष्टीची किंमती वाढतायत. स्टीलचे भाव वाढलेत. इंधन महागलंय. ज्याच्याकडे गाडी आहे, त्याला फक्त इंधन महागल्याचा त्रास होतो असा नाहीये. तर भाजी महागते, सगळंच महागतं. केंद्र याकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही. याविरोधात चळवळी उभ्या राहतील, असंही भाकीतही शरद पवार यांनी यावेळी केलं.

Published on: May 10, 2022 11:55 AM