Sharad Pawar : ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
Sharad Pawar On Thackeray Brothers Unity : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यावर नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत. शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देखील नेत्यांकडून दिल्या जात आहेत. राज ठाकरे यांनी सुतोवाच केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही जाहीरपणे सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यात एका विवाह समारंभासाठी पोहोचले. यावेळी शरद पवार यांना राज आणि उद्धव यांच्या युतीबद्दल विचारण्यात आले. मात्र, शरद पवार यांनी दोघांच्या घडामोडींवर बोलण्यास नकार दिला. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
Published on: Apr 20, 2025 02:25 PM
Latest Videos

नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य

400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं

आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
