हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय...; शरद पवारांचा इशारा कुणाला?

हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय…; शरद पवारांचा इशारा कुणाला?

| Updated on: May 17, 2024 | 10:32 PM

महाराष्ट्रात कुणी तरी भटकता आत्मा आहे. आत्मा कधी असतो तर माणूस गेल्यावर असतो. आम्हाला भटकता आत्मा म्हणाले. एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची ताकद आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीने आमच्याकडे आहे, त्याची उपयुक्तता घेतली जाईल, पवारांचा मोदींवर निशाणा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कुणी तरी भटकता आत्मा आहे असल्याचं म्हणत शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेला शरद पवार यांनी बीकेसी येथील सभेतून प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. हा आम्हाला भटकता आत्मा म्हणाले. एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी संकटाच्या काळात तुम्हाला वाचवलं. तुम्ही विसरला. तुम्ही काहीही म्हटलं टिका केली. तरी मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार जो उद्धव ठाकरे घेऊन जात आहे, त्यामागे शक्ती उभी केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही टीका केली तरी राज्यातील सामन्य माणूस ढुंकूनही पाहणार नाही. तुम्ही आमच्यावर टीका केली. महाराष्ट्रात कुणी तरी भटकता आत्मा आहे. आत्मा कधी असतो तर माणूस गेल्यावर असतो. आम्हाला भटकता आत्मा म्हणाले. एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची ताकद आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीने आमच्याकडे आहे, त्याची उपयुक्तता घेतली जाईल, असं शरद पवार म्हणाले.

Published on: May 17, 2024 10:32 PM