Special Report | NCP चा नवा अध्यक्ष कोण? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद?

Special Report | NCP चा नवा अध्यक्ष कोण? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद?

| Updated on: May 04, 2023 | 7:36 AM

VIDEO | क्लायमॅक्स आणि इमोशन.. साडे ४ तासांचं नाट्य, नवा अध्यक्ष कोण? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण होणार? यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या भाकरी फिरवण्याच्या घोषणेनं ऐतिहासिक नाट्य सुरू झाले. एखाद्या सिनेमा सारखी झालेली पार्टी मिटींग साडे चार तास लाईव्ह होती. मोशन, प्रेम, इमोशन, राग आणि क्लायमेक्स सगळं यामध्ये घडलं. कुठे अश्रू तरळले तर कुठे भावनांचा बांध फुटला तर कुणी हट्टाला पेटलं. तर कुणाचा हट्टा विरोधात राग उफाळून आला. बदल गरजेचा आहे म्हणत अजित पवार कार्यकर्त्याना समजवत होते. सगळं नाट्य जिथे झालं त्या कार्यक्रमाचं नाव होतं लोक माझे सांगाती. राजकीय आत्मकथा- शरद पवार.. या साडे चार तासांच्या कार्यक्रमात नेत्यांच्या विरूद्ध छटा पाहायला मिळाल्या. ऐरवी संयम ढळू न देणारे प्रफुल्ल पटेल अनेकदा चिडले. तर जयंत पाटील यांना रडताना महाराष्ट्रानं पहिल्यांदाच पाहिलं. मात्र राष्ट्रवादीच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्भवलेल्या या पेच प्रसंगाला अजित पवारांची विनोद बुद्धी कायम राहिली बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 04, 2023 07:36 AM