संजय राऊत यांना शरद पवार यांच्या राजीनाम्याची कुणकुण होती? राऊत यांनी थेट सांगितले…
VIDEO | शरद पवार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले, 'शरद पवार यांच्या मनातील अस्वस्थता...'
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला. शरद पवार यांनी केलेल्या या घोषणेनतंर राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, शरद पवार यांच्या या राजीनाम्याची कल्पना अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याव्यतिरिक्त कुणालाच नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यासंदर्भात मोठा खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांच्या राजीनाम्याची आपल्याला कुणकुण होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या मनातील अस्वस्थता जाणवत होती. भाकरी फिरवण्याची वेळ वरून सुरू होते की काय असं वाटतं होतं. त्यांनी मुख्य तव्यावरचीच भाकरी फिरवली. तवाच फिरवला, असे वक्तव्य संजय राऊत यांनी करत याबाबत मोठा दावाच केला. पुढे ते असेही म्हणाले की, शरद पवार यांनी राजकारणातून संन्यास घेतला नाही तर एका विशिष्ट परिस्थितीत किंवा दुसऱ्यांसाठी जागा रिकामी केली पाहिजे असे म्हणत म्हणून शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.